हे साधन कसे काम करते?
घरी किंवा लॅबमध्ये केलेल्या BP व साखरेच्या रीडिंगचा अर्थ काय, ते सामान्य आहे की डॉक्टरांना दाखवायला हवे – हे या साधनाने लगेच समजते. जेवढी माहिती आहे तेवढीच भरा.
- BP चे गट ISH 2020 आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार.
- साखरेचे गट (उपाशी, जेवणानंतर, HbA1c) अमेरिकन डायबिटीज असोसिएशन व ICMR निकषांनुसार.
- HbA1c वरून मागील ३ महिन्यांची सरासरी साखर (eAG) = २८.७ × HbA1c – ४६.७.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
BP किती असावा?
घरी मोजलेला BP १३०/८५ पेक्षा कमी सामान्य मानला जातो. १४०/९० किंवा जास्त वारंवार येत असल्यास उच्च रक्तदाब असू शकतो.
HbA1c म्हणजे काय?
HbA1c ही मागील २-३ महिन्यांतील सरासरी साखर दाखवणारी तपासणी आहे. ५.७% पेक्षा कमी सामान्य, ५.७-६.४% प्री-डायबेटिस आणि ६.५% किंवा जास्त मधुमेह.
हे साधन सर्वसाधारण माहितीसाठी आहे. यातील आकडे व तक्ते अंदाजे असून ते वैद्यकीय निदान किंवा उपचाराचा पर्याय नाहीत. आजार असल्यास, गर्भावस्थेत किंवा औषधे सुरू असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
इतर मोफत आरोग्य साधने
मधुमेह आहार तक्तावय, वजन व आवडीनुसार महाराष्ट्रीय पदार्थांचा १ किंवा ७ दिवसांचा आहार तक्ता.आहार तक्ता बनवाBMI व आदर्श वजन कॅल्क्युलेटरभारतीयांसाठीच्या निकषांनुसार BMI, आदर्श वजन आणि कंबरेच्या मापावरून धोका.BMI तपासादैनंदिन कॅलरी गरज कॅल्क्युलेटरवजन कमी करणे, राखणे किंवा वाढवण्यासाठी रोजची कॅलरी, प्रथिने व जेवणनिहाय विभागणी.कॅलरी काढा
